ब्रेकिंग न्यूज

पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एकास जबर मारहाण करत चाकूने केले वार.

पेठ बीड पोलीस ठाण्याजवळील घटना,मारहाणीत तरुण गंभीर जखमी

 

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचे शर्तीचे प्रयत्न बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत करत आहेत.गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी काही टोळक्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.परंतु बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही.काही दिवसापासून मारहाणीचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्या समोर काल रात्री 10:30 वाजता शंभू चव्हाण(वय 21 वर्ष)राहणार बार्शी नाका ढगे कॉलनी बीड या तरुणाला पाच ते सहा जनाच्या टोळक्याने जबर मारहाण करत चाकूने वार केले असून या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शंभू चव्हाण हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी नाळवंडी नाका कडे जात असताना अचानक अज्ञात टोळक्याने अडवून मारहाण करत तोंडावर चाकूने वार केले.

पेड बीड पोलीस ठाण्यापासून 100 मीटरवर,मुख्य रस्त्यावर मारहाण करत अज्ञाताने चाकूने तोंडावर वार केले असून चव्हाण मारहाणीत शंभू चव्हाणच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यामुळे डोळे उघडण्यास त्रास होत असून,अद्याप पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button