ब्रेकिंग न्यूज

चोरीच्या सात मोटरसायकल सह एक पोलिसांच्या ताब्यात.

सहा लाखाची वाहने जप्त,बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

 

 

बीड जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे नवनीत कॉवत यांनी हाती घेतल्यापासून बीड जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटर सायकल चोरीचे प्रमाण तसेच इतर गुन्हे अनेक गुन्हे उघडकीस झाले आहेत.

बीड पोलीस अधीक्षक यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आनण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेनेशर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. दिनांक 30/05/2025 रोजी पोलीस हवालदार भागवत शेलार यांना माहीती मिळाली की , अंबाजोगाई शहरातुन चोरी गेलेल्या गाडया तळेगांव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असुन त्याची डिल होणार आहे. या बातमीवरुन स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोउनि सिध्देश्वर मुरकुटे व पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता, आरोपी शेख ईलियास शेख गफार, वय 25 वर्ष, रा तळेगांव ता.जि बीड. हा चोरीच्या गाडयासह मिळाला.आरोपीकडुन एकुण 07 मोटार सायकली तपासकामी जप्त केल्या.त्या मोटार सायकली अंबाजोगाई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथुन चोरल्याचे आरोपीने सांगीतले.आरोपीकडे मिळुन आलेल्या मोटार सायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे

अ.क्र प्रकार व कंपणी रंग चेसीस नंबर दाखल गुन्हे.

1)होडा ड्रिम युगा काळया रंगाची ME4JC558AEGT27030 अंबाजोगाई शहर 179/2024 कलम 379 भा.दं.वि

02) हिरो स्प्लेंडर प्लस काळी सिल्वर पट्टा MBLHAR087J5F00402 अंबाजोगाई शहर 298/2023 कलम 379 भा.दं.वि

03)हिरो HF DELUXE सिल्वर रंगाची MBLHAR206H5D01035 तालुका जालना 147/2025 क 303(2) BNS

04)हिरो HF DELUXE लाल रंगाची MHLHAR209JGF14166 बेगमपुरा छ.संभाजीनगर 56/2025 क 303(2) BNS

05)हिरो सिबी शाईन काळी लाल सिल्वर पट्टा ME4JC65AKJ7218187 बेगमपुरा छ.संभाजीनगर 61/2025 क 303(2) BNS

06)होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC653HG7013628 अभिलेख मिळुन आला नाही

07)होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC36JDD7390939 अभिलेख मिळुन आला नाही.

आरोपीकडुन एकुण 05 चोरीचे गुन्हे उघडकीस आले.असा एकुण 07 मोटार सायकली किं.अं 6,00,000/- मुद्देमाल जप्त केला आहे. वर मिळुन आलेल्या मोटार सायकली मुळ मालकांनी संबधीत पोलीस ठाणेशी संपर्क साधुन घेवुन जाव्यात असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

 सदरील कारवाई नवनित काँवत पोलीस अधीक्षक,बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक,बीड, चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक,अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा बीड, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार भागवत शेलार, विकास राठोड, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, नितीन वडमारे, विकी सुरवसे, सुनिल राठोड, मच्छिद्र बीडकर यांनी केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button