भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.
माजलगाव/तेलगाव रोडवर चीरा पडल्याने रस्त्याने घेतला आणखी एकाचा बळी.

माजलगाव (प्रतिनिधी):- भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटनाते लगाव-माजलगाव रस्त्यावर टालेवाडी फाट्या नजीक घडली. तेलगाव माजलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या चिरा पडल्या असुन, या चिरात दुचाकी अडकून अनेकांचा बळी गेला असुन, हा अपघात ही चीर चूकवताना झाल्याचे समजते. त्यामुळे या रस्त्याने आणखी एक बळी घेत त्याची चर्चा घटनास्थळी चालु होती. मयत हाते तेलगाव येथील साखर कारखान्यात नोकरीस होता.
या संदर्भात समजलेली माहिती अशी की, तेलगाव ता. धारूर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात नोकरी असलेले महारूद्र भिमराव लोंढे रा. खालापुरी ता. जि. बीड ह.मु. सुंदरनगर तेलगाव हे दुचाकी क्र.एम.एच.२३-७४२४ ने रविवार दि. १जुन रोजी दुपारी तेलगावकडुन माजलगावकडे जात असताना तेलगाव माजलगाव रस्त्यावर टालेवाडी नजीक रोडला पडलेल्या चिरा चुकवताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र.एम.एच.४४-७३७१ जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात महारूद्र लोंढे हे जागीच ठार झाले.हा अपघात ऐन रस्त्यावरच झाल्याने यामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी अडचण होऊन, यामार्गावरील वाहतुक एकदीड तास ठप्प झाली होती. पोलीस व स्थानिक नागरिकांच्यामदतीने उशीरा वाहतुक सुरळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. महारूद्र लोंढे हे गेल्या कांही वर्षापासुन तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात डिस्लरी विभागात नोकरीस होते. ते कारखाना परिसरात वसाहतीत राहत होते. त्यांच्या अशा अपघाती निधनाने तेलगाव कारखाना परिसरासह खालापुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.