उपोषणकर्ते,वारकरी चढले थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर.
उपोषणाची दखल न घेतल्याने झाडावर चढले.

बीड तालुक्यातील सासुरा गावाचे मठाधिपती रतन महाराज उर्फ रतन दत्तोबा मुंडे आणि संस्था सचिव सुशेन रामराव भोसले करत असलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी म्हणून सासूरा ग्रामस्थ, वारकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणास बसले होते.
उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाची दखल न घेतल्याने उपोषणास बसलेले वारकरी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील पोलीस झाडावर चढून टाळ मृदंगाच्या वाजवून प्रशासनाचा निषेध केला.
ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा या ट्रस्ट चे अध्यक्ष महाराज रतन दत्तात्रे मुंडे व सचिव सुसेन रामराव भोसले हे दोघे मिळून ट्रस्ट मठाधिपती आळंदी येथील संस्थांनची किमान 6-7 कोटी रुपयांची मालमत्ता ज्याच्या नावावर केली त्याचा मोठा भाऊ संस्थानचा सचिव आहे. आणि दूसरा भाऊ गाडीवर चालक म्हणून कामास आहे. तसेच तिघांच्या उत्पन्नाचा मार्ग आणि मिळविलेली संपत्ती याची पडताळणी शासनाने करावी. तत्काळ या ट्रस्ट मधील गैरव्हारातील चौकशी करण्यात यावी यासाठी ०२/०६/२०२५ रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालया समोर गावकरी उपोषणास बसले होते. परंतु आज सकाळी उपोषण करणारे वारकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून त्या मठादीपंतावर व ट्रस्टवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.