
बीड दि (प्रतिनिधी): बीड तालुक्यात अवैध धंदे तसेच गुंडगिरी करणाऱ्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून गुन्हेगारांचा फास आवळ्यासाठी बीड पोलीस अधीक्षक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
धडाकेबाज कामगिरीतून अल्पावधीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक तथा पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी डीवाएसपी पूजा पवार यांनी आपल्या कारवाईतून ओळख निर्माण करत अवैध धंदे करणाऱ्यावर धडकी भरवली आहे.
धडाकेबाज कारवायातून पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील गुटखा, मटका, अवैध दारू विक्री,वेश्या व्यवसाय, वाळू,यासह इतर अवैध धंदे आणि अवैध धंद्यातील माफीयांचे कारवाईच्या जोरदार दणक्याने कंबरडे मोडले आहे. डीवायएसपी पूजा पवार या उल्लेखनीय कामगिरीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.त्यांनी वडवणी सह बीड शहरात देखील अवैध धंद्यावर कारवाया केल्याने यांची एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख झाली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिस ठाणे पिंपळनेर हद्दीमध्ये मौजे शिवणी येथे किराणा दूकाणामध्ये अवैद्य गूटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहीती पूजा पवार यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा मारला. यावेळी विनायक किराणा दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपणीचा १०४८० रू चा गूटखा मूद्देमाल मिळून आला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पूजा पवार यांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. पो स्टे पिंपळनेर हद्दीमध्ये मौजे जूजगव्हाण येथे महिला नामे रूक्मिनी काशिनाथ थोरात व कोंडाबाई भिमराव गायकवाड या अवैद्यरीत्या दारूविक्री करत असल्याची माहीती मिळाली होती. त्यावरून पूजा पवार व त्यांच्या टीमने सदर ठिकाणी पोलीस स्टाफ सह छापा मारला असता रूक्मिनी काशिनाथ थोरात यांचे ताब्यामध्ये ४८९५ /- रू चा देशी विदेशी दारूचा मूद्देमाल मिळून आला तसेच कोंडाबाई भिमराव गायकवाड यांचे ताब्यामध्ये ४०७० /- रू चा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल मिळून आल्याने दोन्ही महिलांचे विरूद्द पिंपळनेर पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक पूजा पवार यांनी केली.