ब्रेकिंग न्यूज

डॉ.संजय जानवळे यांनी बीडची मान उंचावली

दक्षिण आफ्रिकेत मॅराथॉन स्पर्धेत ९० किमी अंतर ११ तासात केले पार.

बीड (प्रतिनिधी):- बीड येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजय जानवळे हे विविध मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करत असून आतापर्यंत त्यांनी देशाबाहेर जाऊनही विविध स्पर्धेत सहभागी होऊन मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचा आदर्श प्रत्येकाने घेण्यासारखा आहे.डॉक्टर संजय जानवळे यांनी दक्षिण आफ्रिका येथे संपन्न झालेल्या कॉम्रेड मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होऊन मिळवलेल्या यशाने बीडची मान उंचावली आहे.

डॉक्टर संजय जानवळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी दक्षिण आफ्रिका येथे संपन्न झालेल्या जगातील एक अवघड व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ‘कॉग्रेड मॅराथॉन’, स्पर्धेत सहभागी होत बीड चे डॉ. संजय जानवळे ९० किमी अंतर ११ तास ३७ मिनिटात पार केले. जगभरातल्या सुमारे ७० देशातील तेवीस हजार धावपटूंनी या स्पर्धे त सहभाग नोंदवला होता. पीटरम रीित्जबर्ग ते डर्बन असा चढउताराचा हा मार्ग पार करताना धावपटूंचा कस लागतो, या स्पर्धेत भारतातून सुमारे ४१२ तर बीडहून डॉ. जानवळेसह अन्य ३ धावपटू सहभागी झाले होते.

त्यात अस्थीव्यंग तज्ञ डॉ. विश्वास गवते ( १० तास ४६ मिनिटे) पोलिस अधिकारी साईनाथ ठोंबरे (सध्या पुणे) ( ११ तास २० मिनिटे) हरी ठोंबरे ( ११ तास १४ मिनिटे) या तिघांनीही या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली.डॉ. संजय जानवळे, ‘पन्नाशी ओलांडल्यानंतर ९० किमी अंतर पार करणे, माझ्यासाठी आव्हान होते.गेली ५ महिने या स्पर्धेसाठी कसून सराव केला. दक्षिण आफ्रिकेत देशाचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत होता. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर खूप आनंद झाला.सर्व बीडकरांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. योगा प्रतिष्ठान व सर्वच धावपटूंनी मार्गदर्शन केले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल डॉ. संजय जानवळे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button