बिंदुसरातील घाण,कचरा वाहनातून उघड्याने वाहतूक केल्याने नागरिकांना त्रास.
बिंदुसरापत्रातील घाण,कचरा व रोडा शहरातील रस्त्यावर

बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीपात्र रुंदीकरण व स्वच्छ करण्याचे काम सध्या सुरू असून बाजारतळ,विजय टॉकिजच्या बाजूने जाणाऱ्या रस्ता लगत असलेल्या बिंदुसरा पात्रातील घाण,कचरा पोकलेन ने तिप्पर मध्ये भरून शहराबाहेर इमामपूर जवळ खड्ड्यात टाकली जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळापूर्वी बिन दुसऱ्या नदीपात्र स्वच्छ व रुंदीकरण करणे आवश्यक होते,परंतु प्रशासनाला उशिरा जाग आल्याने ऐन पावसाळ्यात बिंदुसरा नदी स्वच्छ व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे.
बीड शहरांमधून तिप्पर मधून उघड्यावर घाण घेऊन जात असल्याने त्याच्या दुर्गंध सुटत असून तिप्प ला फाळके नसल्याने रस्त्यावर घाण देखील पडत आहे. त्यामुळे बिन दुसरा नदी मधील घाण काढून शहरात रस्त्यावर टाकली जात आहे का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. तसेच रोडवरील सोमेश्वर मंदिरा जवळील फुलाच्या बाजूला रुंदीकरण सुरू असून त्यामधील रोडा हा देखील त्याच तिप्पर मध्ये वाहतूक केली जात असून शहरातील खराब रस्ते किंवा गतिरोधक वर टिप्पर मधील दगड रस्त्यावर पडत असून एखाद्या नागरिकाला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी स्वच्छ व रुंदीकरण करण्याच्या नावाखाली चाललेला खेळ व टिप्पर मध्ये उघड्याने वाहून नेत जात असलेली घाण व रोडा जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पहावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. तसेच संबंधित विभाग व गुत्तेदाराला याची विचारणा करून त्या टिप्परला फाळके लावण्याचा व शहरातील घाण झाकून नेण्याच्या सूचना देखील देण्यात याव्यात.