प्रा.विजय पवार,खटावकरच्या अटकेसाठी क्लासेस समोरच ठिय्या आंदोलन.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक विजय पवार व प्रशांत खटावकर यांनी एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गन्हा दाखल झाला आहे.
शिक्षकी पेशाला काळिंबा फासणारी ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. पवार व खटावकर यांच्या अटकेसाठी आज सकाळपासूनच शाहूनगर भागातील उमा किरण कोचिंग क्लासेसच्या गेट समोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले.यावेळी क्लासेस बाहेर पोलिसाांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.विजय पवार यांनी यापूर्वीही अनेक अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आले.यामुळे त्या दोन नराधमांना अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रा.विजय पवार व प्रशांत खटावकर विरोधात घोषणाबाजी देत तत्का अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.