वाल्मिक कराडच्या दोषमुक्ततेसह प्रॉपर्टी संदर्भात २२ जुलैला फैसला.
वाल्मीक कराडचे वकील काय म्हणाले पहा.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडने देशमुख हत्या प्रकरणातून दोष मुक्त करावे असा अर्ज न्यायालयात केला त्याची सुनावणी आज न्यायालयात पार पडली असून याप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २२ जुलै २०२५ रोजी होणार आहे.
आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती अर्जावर आणि त्याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी यावेळी उपस्थित राहून न्यायालयाला माहिती दिली की, दोषमुक्ती आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावर २२ जुलै रोजी निर्णय होईल. विशेष म्हणजे आज कोर्टामध्ये सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांनी निकम यांना वाल्मिक कराडची नाशिक कारागृहात रवानगी होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता निकम म्हणाले की, यासंदर्भात आमच्याकडे कसलाही अर्ज आलेला नाही, हा सर्वस्वी निर्णय कारागृह प्रशासनाचा आहे. २२ जुलैला न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराड याला बीडमधील तुरुंगातून नाशिकच्या कारागृहात हलवण्याबाबतच्या चर्चावर निकम यांनी स्पष्ट केले की, ही बाब तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत येते. यासंदर्भात न्यायालयात कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, आणि न्यायालयानेही याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात आहे.आरोपींच्या मालमत्ता जप्त न करण्याच्या अर्जावरही आज चर्चा झाली, आणि याबाबतही २२ जुलै रोजी निकाल जाहीर होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, वाल्मिक कराड याच्या बँक खात्यावरील सील रद्द करण्याच्या मागणी वरही युक्तिवाद झाला असून याचा निर्णय २२ जुलै होणार आहे.२२ जुलै रोजी न्यायालय काय निकाल देणार याकडे बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राची लक्ष लागले आहे.