ब्रेकिंग न्यूज

बनावट पिस्तुल दाखवून बसचालकास धमकी देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात.

स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड बसस्थानक परिसरात बनावट पिस्तुल दाखवून बसचालकाला धमकावणाऱ्या दोघा इसमांना शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. ही घटना ७ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता बीड बसस्थानक इनगेटजवळ घडली. बसचालक इरफान शेख हे उभे असताना,त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत दोन अनोळखी इसम झटापट करत होते. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इरफान यांना तुझा काय संबंध ? असे म्हणत एकाने कमरेतील पिस्तुल दाखवून धमकावले आणि बुलेटवरून पसार झाले. याप्रकरणी इरफान यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही व गोपनीय माहितीनुसार, अभिजीत दिलीपराव जाधव व अभिजीत कमलाकर कांबळे या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून बनावट पिस्तुल व बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे यातील आरोपी कांबळे याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.किशोर पवार, पोनि. शिवाजी बंटेवाड, पोह. आघाव, पोना.मराडे, पोशि. शिंदे, पोशि. राडकर, पोशि. रहाडे, पोशि.महानोर, पोशि. आगलावे, पोशि.सानप, पोशि.रणदिवे, पोशि.राठोड पोशि.कांदे, पोअं.मनोज परजने, सय्यद अशपाक यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button