सावकार डॉ.लक्ष्मण जाधव व आत्महत्या केलेल्या रामा फटालेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून रामा फाटलेने जीवन संपवले होते.

बीड शहरातील पेठ बीड भागात सावकाराच्या त्रासाला व धमकीला कंटाळून व्यावसायिक रामा फटाले वय ४२ वर्ष राहणार काळा हनुमान ठाणा यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
रामा फटाले हे कपडे खरेदी करून जिल्ह्यातील आठवडी बाजारामध्ये कपडे विक्री करत होते, कपडे खरेदी व्यवसायासाठी पैसे लागत असल्याने त्यांनी बीड मधील काही सावकाराकडून पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशाचे व्याज वेळेवर न दिल्याने सावकार डॉ. लक्ष्मण जाधव यांनी राम फटाले यांना फोनवरून धमकावत घरी येऊन बसण्याची, पोर घेऊन येती अशी भाषा केल्याने राम फटाले यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
आत्महत्या करण्यापूर्वी फटाले यांनी चार पाणी चिठ्ठी लिहून त्यामध्ये अनेक सावकारांची नावे लिहिली होती.या प्रकरणी काही सावकार पोलिसाच्या ताब्यात असून त्यांना दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मयत राम फटाले यांच्या कुटुंबीयांनी यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आमच्या जीवितास धोका असल्याची देखील तक्रार केली आहे.
सावकार डॉ.लक्ष्मण जाधव व मयत रामा फटाले यांची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाल्याने समाज बांधवात संतप्त प्रतिक्रिया येत असून डॉक्टरकी पेशातील व स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्या सावकाराचा खरा चेहरा उघड झाला आहे.या कॉल रेकॉर्डिंगची पार्श्वभूमी पुष्टी करत नाही.