
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून दुचाकी चोरांचा तपास करून कारवाई करण्याच्या सूचना बीड पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिल्याने दुचाकी चोरांची माहिती मिळवून दुचाकी चोरांना गजाआड केले जात आहे.
काल दिनांक 08/07/2025 रोजी आरोपी नामे ऋषिकेश उर्फ सागर सुरेश येवले, वय 21 वर्ष रा. डोंगरकिन्ही ता. पाटोदा जि. बीड यास ताब्यात घेऊन त्यांनी विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या एकूण 14 मोटर सायकल जप्त करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन अमळनेर येथे गुरन 124/2025 कलम 318 (4), 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर चोरीच्या मोटर सायकल संदर्भाने पुणे, अहिल्यानगर व संभाजीनगर येथे एकूण सात (07) गुन्हे दाखल आहेत.या दुचाकी चोराकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा PSI/ श्रीराम खटावकर,HC/ अशोक दुबाले,HC/ आनंद मस्के,HC/ सोमनाथ गायकवाड,NPC/ बाळू सानप,PC/ अर्जुन यादव,PC/ सिद्धार्थ मांजरे यांनी केली.