पोस्को प्रकरणी प्रा.विजय पवार,खाटोकरला जामीन मंजूर !
प्रा.विजय पवारचा मुक्काम मात्र कोठडीत,ॲट्रॉसिटी प्रकरणी जामीन बाकी.

बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात न्यायालयीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी कोठडीत असलेले विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फसल्याने या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती.
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बारावीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने विजय पवार व खाटोकर यांच्याकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर या दोघांना पोलिसांनी मांजरसुंबा परिसरातून अटक केल्याचे दाखवून न्यायालयात हजर केले होते दोन वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
गुरुवारी याबाबतीत न्यायालयासमोर आरोपीचे वकील ॲड.बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली. यावर न्यायालयाने पवार आणि खाटोकर या दोघांना जामीन मंजूर केला आहे.
प्रा. विजय पवार चा मुक्काम मात्र कोठडीच. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रा. विजय पवार व खाटोकर याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी विजय पवार वर एक अल्पवयीन मुलीच्या पालकाने ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्याप्रकरणी उद्या विजय पवार याची न्यायालयात सुनावणी होणार असून ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये जामीन होणार का?हे पाहावे लागेल न्यायालयाने ॲट्रॉसिटी मध्ये जामीन दिली नाही तर विजय पवार चा मुक्काम न्यायालयीन कोठडीत वाढ होणे शक्यता आहे.
जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने प्रसिद्ध विधितज्ञ अॅड.बाळासाहेब कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना जामीन मिळावा अशी मागणी केली.त्यांना अॅड.गणेश कोल्हे,अॅड.संज्योत महाजन,अॅड.योगेश सुरवसे,अॅड.अभिजीत चौरे, अॅड.धनराज जाधव व अॅड.सोनवणे यांनी सहकार्य केले.