ब्रेकिंग न्यूज

महादेव मुंडे कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! मुख्यंत्र्याचे एस.आय.टी स्थापन करण्याचे आदेश.

बंगल्यावरून फोन येतो आणि पुढे काहीच होत नाही आणि तो बंगला धनंजय मुंडेंचा. ज्ञानेश्वरी मुंडे

बीड(प्रतिनिधी)परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांडाला तब्बल २१ महिने उलटले तरीही आजवर दोषींना अटक झालेली नाही.त्यामुळे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागील आठवड्यात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषारी द्रव्य प्राशन केले तरीही ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळत नसल्याने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेण्याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत परळीतील गुंडगिरी बाबद धक्कादायक माहिती सांगितली.

महादेव मुंडे यांच्या पत्नीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दु‌पारी दोन वाजताची वेळ देण्यात आली.जे काही या प्रकरणांमध्ये घडलं हे सगळं मी मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं.

 मागील २१ महिन्यापासून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.महादेव मुंडे यांची ज्यांनी हत्या केली ती आरोपी अजूनही मोकाट आहेत.आता जी नाव आरोपींची आहेत ती नाव मी गुप्तपणे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे.

बंगल्यावरून फोन येतो आणि पुढे काहीच होत नाही आणि तो बंगला धनंजय मुंडेंचा आहे. खळबळजनक आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आहे. तसेच मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये एसआयटी आणि सीआयडी मार्फत तपास व्हावा, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली.

बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंह बाळ बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणला आहे. बांगर यांनी मुंडे कुटुंबीयांना भेट देत मी तुमच्या न्यायाच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले होते. आता या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला आणि २२ ऑक्टोबर रोजी रात्री १२.१५ ते १.३० असे सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला. त्यांच्या शरीरावर तब्बल २० से.मी. लांब, ८ से.मी. आणि ३ से.मी. रुंद असा हा वार होता. तर त्याच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. मानेवरचा वार चुकविल्याने तोंडावर वार झाला होता. तोंडापासून कानापर्यंत एक वार झाला त्याची लांबी १३ से.मी. इतकी होती तर रुंदी व खोली दीड सेंटीमीटर होती.मानेवरील वार खोलवर असल्याने अतीरक्तस्त्रा होऊन मृत्यू झाला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे कुटुंबाच्या सर्व व्यथा तसेच मागण्या व्यवस्थित पणे समजून घेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना महादेव मुंडे हत्या प्रकरणात एस.आय.टी स्थापन करण्याचे आदेश दिले.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी व महादेव मुंडे न्याय देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. मुख्ययमंत्री फडणवीस भेट घेतली यावेळी आमदार सुरेश धस, बाळा बांगर,ज्ञानेश्वरी मुंडे,महादेव मुंडे यांचे आई वडील व मुलगा सोबत होता.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button