बीड शहर पोलीस ठाण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न !
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी रक्तदान करून केले अण्णाभाऊ साठेंना अभिवादन..

बीड(प्रतिनिधी) साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहर पोलीस स्टेशन येथे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.
रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह बीड शहर चे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान केले.
याप्रसंगी बोलताना नवनीत कॉवत त्यांनी सांगितले की, थोर पुरुषांच्या जयंती साजरी करत असताना सर्वांनीच लोकाभिमुख उपक्रम राबवणे गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा थोर पुरुषांचे जयंती उत्सव राबवत असताना आपण सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेपासून दूर जात आहोत. थोर पुरुषांची शिकवण आपण विसरत चाललो आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच याप्रसंगी त्यांनी सांगितले की, लोकांनी स्वतःहून पोलिसांना समाजात काही चुकीची घडत असलं त्याची माहिती द्यायला पाहिजे जेणेकरून पोलिसांना त्यावर चांगले काम करता येईल. याप्रसंगी सहभागी झालेल्या लोकांचे कौतुक करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमात पोलीस स्टेशन बीड शहर च्या 11 अंमलदार यांनी रक्त दान केले तसेच या रक्तदान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित आणि शांतता कमिटी सदस्य फारुक पटेल,शफीक भाऊ,परशुराम गुरखुदे,अजिंक्य चांदणे,विजय चांदणे,विनोद हतागले,सचिन उबाळे,इकबाल शेख,जैतूला खान,नसीम ईनामदार, खालेद फारुकी,करन लोंढे, बळी गवते,खुर्शिद आलम, गोपाल धांडे, अश्पाक ईनामदार,बरकत पठाण,समीर तांबोळी,व इतर असे शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते.