
बीड नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे यांची आज बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड वरून शैलेश फडसे यांची नियुक्ती झाली आहे.
बीड नगरपालिकेमध्ये नीता अंधारे यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून बीड शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागले होते, त्यामुळे अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी नीता अंधारे यांची बदली करण्याची मागणी केली होती. परंतु राजकीय वरदहस्त असल्याने नीता अंधारे यांच्या बदली होत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. गेल्या अनेक महिन्यापासून मुख्याधिकारी नीता अंधारे या वादग्रस्त राहिल्या होत्या,आज अखेर नीता अंधारे यांची बदली होऊन त्यांच्या जागी नांदेड येथील शैलेश फडसे यांची नियुक्ती झाली आहे.