ब्रेकिंग न्यूज

अवैध वाळू वाहतूक करणारा आईशर टेम्पो पकडला.

महसूल पथक व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात वाळू,मुरुम उत्खनन व वाहतुकीवर बंदी असताना देखील काही ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असून त्यावर महसूल पथक व पोलिस प्रशासन कारवाई करत वाहने जप्त करुन दंड वसूल जात आहे.

अवैध गौण खनिज रोखण्यासाठी महसूल विभागाणे एक पथक करण्यात आले होते पथक प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत जाधवर नायब तहसीलदार यांची 18/7/25 ते 31 जुलै 12 दिवसात 2 माती 3 मुरुम वाहतूक करणारे टिपर, 1आयशर टेम्पो,1 जेसीबी व सेसेवाडी येथील खाडी क्रेशरवर कारवाई करण्यात आली होती.

दिनांक 31 /07/ 2025 च्या रात्री महसूल पथक व पोलीस पथक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखणे कामी धुळे सोलापूर महामार्गावर संयुक्तपणे गस्त घालत असताना पेंडगाव जवळ एक आईसर कंपनीचा MH 23CU 4491 क्रमांकाचा टेम्पो 04 ब्रास वाळू सहित वाहतूक करत असताना आढळला.. वाहनाचा चालक नामे गणेश भिमराव जाधव राहणार गुळज ता. गेवराई यास वैध गौण खनिज वाहतूक परवान्याची विचारणा केली असता त्याने असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तसेच सदर वाहनातील वाळू ही म्हाळस पिंपळगाव ता. गेवराई येथून भरून आणल्याचे सांगितले. सदरचे वाहन अवैध गौण खनिज वाहतूक करत असताना आढळल्याने पुढील कारवाई करता तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलेले आहे.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या आदेशाने व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार (बीड) प्रशांत जाधवर,पोलीस निरीक्षक (ग्रामीण पोलीस स्टेशन)  बाळराजे दराडे,पोलीस उपनिरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) विघ्ने,मंडळ अधिकारी पेंडगाव अंगद काशीद, ग्राम महसूल अधिकारी पेनगाव विकास ससाने,वरपे  जोगदंड यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button