
बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये गावठी कट्टा तसेच घातक शस्त्र वापरणाऱ्या च्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली असून,बीड जिल्ह्यात गावठी कट्टे पुरवणऱ्याचा शोध घेणे पोलिसापुढे आवाहन झाले आहे.
बीड जिल्हामध्ये अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या ईसमांची माहीती काढुन गावठी कट्टा बाळगणाऱ्या ईसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यावरुन दिनांक 09.08.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला माहीती मिळाली की, तकीया मज्जीद जवळ, लेंडी रोड, उपविभागीय वन कार्यालय गेट जवळ एक फिकट निळ्या रंगाचे टिशर्ट व निळी पॅट घातलेल्या ईसमाने त्याचे कंबरेला गावठी कट्टा लावलेला आहे व कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन लागलीच पथक रवाना होवुन पथकाने लेंडी रोड, वनविभागाचे समोरील परीसरातुन ईसमनामे सागर उर्फ सनी प्रकाश मोरे, वय 24 वर्ष, रा. खडी क्रशरच्या बाजुला, जुना धानोरा रोड, जिजाऊ नगर, बीड यास ताब्यात घेवुन त्याचे कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मिळुन आले. त्यानी सदरील पिस्तुल वैभव संजय वराट रा. चक्रधरनगर, बीड व रितेश प्रभाकर वडमारे रा.राजुरी वेस, बीड या दोघांनी दिल्याचे सांगीतले. त्याचेकडुन किंमती 40,000 रु पिस्तुल जप्त् करुन तिनही आरोपीविरुदध पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 153/2025 कलम 3/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी ही नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, आनंद म्हस्के, राहुल शिंदे, अंकुश वरपे, पोलीस अंमलदार मनोज परजणे, आशपाक सय्य्द, अर्जुन यादव, यांनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये गावठी कट्टे येतात कुठून याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची गरज आज बीड पोलिसांना आहे.