ब्रेकिंग न्यूज

बस स्थानकात गळ्यातील चैन चोरणारा दोन दिवसात पोलिसांच्या ताब्यात.

परळी पोलीसांची कौतुकास्पद कारवाई.

बीड(प्रतिनिधी)परळी पोलिस ठाण्यात दि. 14/08/2025 रोजी नाथराव माणिकराव फड वय 67 वर्षे व्यवसाय – सेवानिवृत रा.शंकर पार्वती नगर परळी,यांनी फिर्याद दिली की, दि. 13/08/2025 रोजी 10.55 वाजताच्या दरम्यान परळी बस स्थानक येथुन अंबाजोगाई येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील सोन्याचा गोप वजन 25 ग्रॅम सध्या किं. अंदाजे 2,50,000/ रुपयेची सोन्याचा गोप कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरले बाबत. पो.स्टे. संभाजीनगर येथे दि. 14/08/2025 रोजी गु.र.नं. 164/2025 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि.ढोणे यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सफौ, 613 सौंदनकर यांचेकडे देण्यात आला.

गुन्ह्याचे संदर्भात व फिर्यादी हा जेष्ठ नागरीक असलायने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे व मा. अ.पो.अ.तिडके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीयपोलीस अधिकारी शिंदे यांचे सुचने प्रमाणे परळी शहरात नविन अ‌द्यावत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या फुटेजच्या आधारे तसेच सायबर सेल यांची तांत्रीक मदत घेवुन सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा आरोपी नामे प्रकाश श्रीराम जाधव वय 34 वर्षे रा. हिवरसिंगा ता. शिरूर जि. बीड याने केला असल्याचे निषपन्न झाल्याने पो.स्टे. संभाजीनगर डी.बी. पथक यांनी खोकर मोहा ता. शिरूर जि.बीड येथुन आरोपीला ताब्यात घेवून नमुद आरोपीकडे सखोल तपास करून त्याचेकडून सोन्याचा गोप वजन 25 ग्रॅम किं. अंदाजे 2,50,000/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याची पुढील कार्यावाही चालु आहे. सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.एस. ढोणे, ग्रेपोउपनि मिसाळ, सफौ/613 सौंदनकर, व डी.बी. पथकातील सफौ /1253 नागरगोजे, पोह/416 साजीद पठाण, पोअ./710 चव्हाण, पोअं. 1721 डोंगळे, पोअं. 1109 घुगे सर्व पो.स्टे. संभाजीनगर यांनी प्रभावीपणे कामगीरी बजावली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button