
अंबाजोगाई – अभय जोशी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक पद्मश्री डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळी चालवणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली. परंतु खूनाचे षडयंत्र रचणाऱ्या, मदत करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच पडद्यामागील मुख्य
सूत्रधारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करण्यात यंत्रणेने टाळाटाळ केली आहे असा अभिप्राय मा. न्यायालयाने नोंदवला आहे.
ह्या बाबत आपला सर्वांचा आक्रोश निर्भय मॉर्निंग वॉक फेरीव्दारे संवैधानिक मार्गाने, विवेकीपणाने व्यक्त करण्यात येईल. तसेच प्रशासनाला सर्वांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले
*दि 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता* महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंबाजोगाई शाखा आणि सर्व पुरोगामी संघटना यांच्या संयुक्त सहभागाने निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आलेले होते
डॉ दाभोलकरांनी आयुष्यभर केलेल्या विज्ञानप्रसाराच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी 20 ऑगस्ट हा दिवस देशभर *वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस* म्हणून आयोजित केला जातो. या दिवशी शाळा-कॉलेज मधून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन देणारे व्याख्याने, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या निर्भय मॉर्निंग वॉकव्दारे मुख्य सुत्रधारांना पकडण्याचे आवाहन करणे, डॉ. दाभोलकरांचे वैज्ञानिक दृष्टिकोनवादी, समता-बंधुत्ववादी विचारांचा प्रसार करणे, आणि विचारांची लढाई विचारांनी लढावी , हा संदेश देणे या उद्देशासह ,
अंबाजोगाई व परिसरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व चळवळीचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला, सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता SRT कॉलेज अंबाजोगाई येथे जमुन आणि लोकशाही पद्धतीने अतिशय शांतपणे होणाऱ्या या मॉर्निंग वॉक/जागर फेरी झाली.
आपले विनीत – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि अंबाजोगाईतील सर्व पुरोगामी संघटना
*फेरीचा मार्ग*
-संविधान कट्टा SRT महाविदयालय अंबाजोगाई
-डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
-बस स्टँड
-छ. शिवाजी महाराज चौक येथे या फेरीचा समारोप झाला.