बिंदुसरा तलावावरून उडी घेऊन स्टंट करताना तरुण वाहून जाता जाता वाचला ! व्हिडिओ पहा.
हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप द्यावा.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाळापूर्वी सर्व मंडळांत संततधार पाऊस झाल्याने जवळपास सर्व नदी नाले ओसंडून वाहिले यामुळे पावसापूर्वीच तलाव तुडुंब भरले आहेत.
बीड शहरालगत पाली जवळील बिंदुसरा प्रकल्प भरून वाहत असल्याने बीड शहरातील नागरिक पाली तलावावर जाऊन पाण्याचा आनंद घेत आहेत.तर काही तरुण पाण्यात हुल्लडबाजी करताना दिसत आहे.याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्यानेच तरुण पाण्यात उतरून स्टंट करत आहेत.
दोन दिवसापूर्वी एक तरुण बिंदुसरा चादरीवर जाऊन पाण्यात उडी घेत स्टंट करण्याच्या नादात वाहून जाता जाता वाचला.त्याला तेथील नागरिकांनी हाथ देऊन पाण्या बाहेर काढल्याने बचावला.पाण्यात जाऊन,जीव धोक्यात घालून काही नागरिक,महिला सेल्फी,फोटो काढत आहेत,तर काही तरुण चादरी वरून पाण्यात उड्या घेत आहेत.मागील काही वर्षाचा इतिहास पाहता बिंदुसरा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला होता,यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊन स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी चोप द्यावा तरच अशा हुल्लडबाज तरुणांना अद्दल घडेल.