ब्रेकिंग न्यूज

सरकारी वकील चंदेल आत्महत्या प्रकरणी न्यायाधीश,लिपिकावर गुन्हा दाखल.

आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायाधीश,लिपीक अपमानास्पद वागणूक देत असल्याचा उल्लेख.

बीड(प्रतिनिधी)वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल वय 47वर्ष, रा. इंदेवाडी, जि. परभणी यांनी बुधवारी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.न्यायालयात गळफास घेतल्याने खळबळ उडाली होती.चंदेल यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.त्या चिठ्ठीत दोघांची नावे असल्याने दोन दिवसानंतर न्यायाधीशासह लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲड.विनायक चंदेल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायाधीशासह लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल वय 19 वर्ष यांनी वडवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील जानेवारी 2025 मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून वडवणी न्यायालयात रूजू झाले होते. जून 2025 पासून वडवणी कोर्टातील नवनियुक्त न्यायाधीश रफीक शेख आणि लिपीक आण्णासाहेब तायडे हे त्यांना विनाकारण मानसिक त्रास देत होते. कामामध्ये अपमानित करणे, मनमानी काम करणे आणि त्यांचे म्हणणे न ऐकल्यामुळे ते सतत ताणतणावात राहत असत. त्यातूनच त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्वजित याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

दरम्यान बुधवारी सकाळी सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतू त्यात न्यायाधिशांचे नाव असल्याने वडवणी पोलिसांकडून ही माहिती दडवण्यात आली होती. शिवाय विनायक यांचा मुलगा विश्वजीत यानेही पोलिसांवर गुरूवारी आरोप केला होता. या प्रकरणात सगळीकडून टीका होत असल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला नातेवाईकच तक्रार द्यायला येत नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला असला तरी विश्वजीत यांच्या आरोपामुळे त्यात किती तथ्य आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.मुलगा विश्वजित याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र न्यायाधीश व लिपिक वर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पुढील तपास वडवणी पोलिस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button