पाझर तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू.
बीड अग्निशामक दलाने दिवसभर केले होता शोध.२४ तासांनी मृतदेह सापडला.गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी येथील घटना.

बीड(प्रतिनिधी)यावर्षी बीड जिल्ह्यात सर्व मंडळामध्ये संततधार पाऊस झाल्याने नदी,नाले,पाझर तलाव तुडुंब भरले असल्याने शेतकरी सुखावला आहे.
पोहण्यासाठी पाझर तलावात उतरलेला शेतकरी बुडाला असल्याची घटना शुक्रवार (दि. २२) सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास भेंडटाकळी (ता. गेवराई) येथे घडली असून, गावातील ग्रामस्थांनी लोंढे यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता,परंतु शोध करून देखील सापडत नसल्याने बीडच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली असता तत्काळ बीड अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पाझर तलावात जाऊन शोधकार्य सुरू केले होते.परंतु रात्री उशिरापर्यंत लोंढे यांचा शोध लागला नव्हता. बिभीषण सुदाम लोंढे (वय ५३ वर्ष) रा. भेंडटाकळी (ता. गेवराई) असे पाझर तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी गट क्रमांक १७३ मध्ये असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी लोंढे उतरले होते. यावेळी ते तलावात बुडाले असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्याने शोध घेऊन ही सापडत नसल्याने ग्रामस्थांनी याची प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने शोध घेण्यासाठी बीड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले आहे. शोध बचाव टीमचे अधिकारी किशोर जाधव, कृष्णा जंगले, अनिकेत कपाळे, ओंकार राठोड, विष्णू बांगर यांनी शोध सुरू केला आहे. पण शनिवारी दुपारी १२:३० पर्यंत यश आले नव्हते ही घटना समजताच ग्रामस्थांनी पाझर तलावावर मोठी गर्दी केली.परंतु आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास प्रेत पाण्यावर तरंगत असतानाचे काही गावकऱ्यांनी दिसले, गावकरी व अग्निशामक दल कर्मचाऱ्यांनी प्रेत पाण्याबाहेर काढले.