मनोज जरांगेंना”आझाद मैदानात नो एन्ट्री”!
मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या:हायकोर्ट.

बीड (प्रतिनिधी) शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण व सगेसोयरे बाबत घोषणा करून देखील प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी न केल्याने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक घेत २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन करणार असल्याचे निर्देश सरकारला दिले होते.
आंदोलनाला दोन दिवस बाकी असतानाच आज न्यायालयाने आझाद मैदानात नो एन्ट्री, उल्लंघन केल्यास सहा महिन्यांची शिक्षा. न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही असे सांगितले.
जरांगेंना हायकोर्टाने मनाई करताच सदावर्तेंचा एल्गार, म्हणाले, ‘डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री’ मुंबईतील आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्त यांनी मनोज जरांगे यांना डिवचले आहे. मनोज जरांगे यांना आता डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री असेल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
मुद्दा असा आहे, न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात दोन याचिका आहेत, एक जनहित याचिका आणि दुसरी माझी याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसिहा किंवा मास्टरमाईंड असतील त्यांनी आता जरागे यांना सांगावं की, आता नो एन्ट्री इन आझाद मैदान. डंके की चोटपर असा हा आदेश आहे. तो प्रत्येकाला लागू आहे,असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंवर तुटून पडले :
आता मनोज जरांगेला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचे नाही. मनोज जरांगे हा काय एवढा मोठा नाही, तो नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. जरांगेला कोर्टाचा आदेश ऐकावा लागेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेला भेटायला जाणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. मनोज जरांगे ज्याप्रकारे बेकायदा आणि परवानगी नसताना बोलत आहेत, लोकांची आई-बहीण काढत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या याचिकेत टाकल्या आहेत. हे गंभीर गैरवर्तन आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सहा महिने शिक्षा होऊ शकते. आझाद मैदानात दोन आठवडे काही करायचं नाही, न्यायालयाचा निकाल हा सर्वंकष असतो. तो सगळ्यांना बंधनकारक असतो. हे मनोज जरांगेंनी आपल्या डोक्यात घालून घ्यावं, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.