उपोषणकर्ते वायबसे कुटुंबीयांनी दिला २४ तासाच्या आत आत्मदहनाचा इशारा !
डॉ.वायबसे व त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल करण्यात यावे.

केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटुंब गेल्या 15 ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यासाठी, केज येथील डॉक्टर वायबसे त्याच्या गुंडाच्या टोळीवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसलेल आहे.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार असताना मदत करणारे हे डॉक्टर वायबसे असून त्यांनी गुंडाच्या टोळ्या पोसल्या आहेत.डॉक्टर वायबसे व त्यांच्या टोळीने राम हरी वायबसे यांना जबर मारहाण करून देखील धारूर पोलीस निरीक्षकांनी उलट रामहरी वायबसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा देखील आरोप केला आहे.यामुळे वायबसे कुटुंब दहशतीखाली असून गावाकडे जाण्यास सुद्धा घाबरत आहे. गेल्या आठवड्यात धनंजय देशमुख यांनी उपोषणकर्ते वायबसे कुटुंबीयांची भेट घेतली होती. तरीही बीड पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी उपोषणाचे दखल न घेतल्याने शिवसेनेच्या आत आत मधून करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वायबसे कुटुंब ऊन,वारा,पाऊस व अंधार यांचा सामना करत अन्यायाविरुद्ध लढा संविधानिक पद्धतीने सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन कुठली भूमिका घेत नसल्याने. डॉक्टर वायबसे यांच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना त्या गुंडाच्या टोळीवर पोलीस निरीक्षकाचे पाठबळ असल्याने डॉक्टर वायबसे व त्यांच्या गुंडाची टोळी ही मोकाट आहे. पोलीस व जिल्हा प्रशासन उपोषणाचे दखल घेत नसल्याने येणाऱ्या 24 तासात मला न्याय न दिल्यास मी आत्मदहन करणार असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.