दारूबंदी विरोधात महिला आक्रमक,दारूच्या अड्डावर स्टिंग ऑपरेशन !
महिला रणरागिनी आम्रपाली साबळे,सारिका पाटील,महिला सरपंच इंगोले यांनी केली गावातील दारूबंदीची मागणी.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरासह तालुका व खेडेगावात,वस्त्यांवर अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अवैध दारू विक्री करणाऱ्यावर दारूबंदी अधिकारी व संबंधित पोलिस ठाणे डोळेझाक करत असल्याने दारूविक्री खुलेआम सुरू आहे.
बीड तालुक्यातील आहेर धानोरा गावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी गावातील दारूबंदीसाठी निवेदन देत आज आक्रमक भूमिका घेतली. गावात सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यांवर महिलांनी धडक देत मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या फोडल्या व अड्डे उद्ध्वस्त केले.दारू बंदी अधिकारी व बीड ग्रामीण पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाने अवैध दारूविक्री खुलेआम होत असल्याचा आरोप महिला सरपंचांनी केला आहे.ही कारवाई भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ. आम्रपाली साबळे व आहेर धानोरा येथील महिला सरपंच मोनिका इंगोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दारूबंदी करण्यात यावी यासाठी गावातील महिलां मोठ्या संख्येने स्टिंग ऑपरेशनमध्ये सामील झाल्या होत्या. यावेळी गावातील दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत गावातील दारू विक्रेत्यांविरोधात मोर्चा काढत थेट अड्ड्यांवर कारवाई केली.
अवैध विनापरवाना दारूबंदी असूनही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आहेर धानोरा गावात अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून व्यसनाधीन होत आहे. दारू पिल्याने घराघरात, कुटुंबात व गावात भांडण होत आहेत.त्यामुळेच आम्ही हा निर्धार करून अड्डे उद्ध्वस्त केले,” असे महिला सरपंच इंगोले यांनी सांगितले.
महिलांच्या या धडक कारवाईमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनावर कठोर कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे.दारूबंदी अधिकारी व बीड ग्रामीण पोलिसांनी यावर कारवाई केली तरच अवैध दारूविक्री बंद होईल.यावेळी गावातील महिला आक्रमक होवून दारू विकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.