महिलांचा दुर्गावतार ! महिलांनी नशेखोराला दिला चपलांचा चोप.
परळी रेल्वे स्थानक तीन दिवसापूर्वी बालिकेवर झाला होता अत्याचार,पोलिसांनी ग्रस्त वाढवावी.

बीड (प्रतिनिधी)परळी येथील रेल्वे स्टेशनवर एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर तीन दिवसापूर्वी झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे काढण्यात आला होता. चिमुकलीवर झालेल्या अत्याचात्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती, त्या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ शहरात रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस कर्मचारी कर्तव्यावर नसल्याने अशी निंदनीय घटना घडली असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात आले.
चिमुकल्या न्याय मिळावा व त्यां नराधमाला फाशी देण्यात यावी यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातून मोर्चा काढण्यात आला होता. रेल्वे स्टेशन परिसरात मद्यधुंद तरुण धिंगाणा घालत असताना महिलांनी त्याला चपलीचा चोप देण्यात आला.
चिमुकलीवर झालेले अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात महिला आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मूक मोर्चा काढला. हा व मोर्चा परळी रेल्वे स्टेशनवर पोहोचला. याच वेळी, स्टेशनच्या आवारात एक तरुण दारु पिऊन मोठा गोंधळ घालत होता. तो इतरांना शिवीगाळ करत होता, ज्यामुळे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व महिलांमध्ये संताप वाढला.
मोर्चातील महिलांनी मद्यधुंद तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याला पकडले आणि त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. समज दिल्यानंतरही तो शिवीगाळ करत असल्याने महिलांनी त्याला चपलांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मोर्चात अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी ग्रस्त वाढवावी अशी देखील मागणी केली आहे.