जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदेवर बलात्काराचा गुन्हा दाखल.
राजकीय वर्तुळात खळबळ ! शिंदेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची पिडितेची तक्रार दिली.

बीड(प्रतिनिधी) नेकनूर येथील जिल्हा परिषद सदस्य नारायण बलभिम शिंदे यांनी सहशिक्षिका असलेल्या पिडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नारायण शिंदेंनी फ्लॅटसह इतर कामासाठी पैसे घेऊन विश्वासघात करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही पिडितेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी नारायण शिंदेंविरूध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २००६ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेवून शिंदे यांनी लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारिरीक संबंध ठेवून फ्लॅटसाठी व इतर कामासाठी पैसे घेऊन अन्यायाने विश्वासघात केला व जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील तक्रारीनुसार नारायण बलभिम शिंदे यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ४०६,५०६ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.किशोर पवार करीत आहेत. दरम्यान नारायण बलभिम शिंदे हे नेकनूर जि.प.सर्कलचे माजी सदस्य असुन ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच माजी जि.प.सदस्य शिंदेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची पिडितेची तक्रार दिली यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.