मेंढपाळ,सालगडी मुलाचा खून करून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
तीन दिवसात अटक,बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

दिनांक 05/09/025 रोजी फिर्यादी नामे गोपाळ भिमराव शिंगाडे धंदा मेंढपाळ रा. कासारी, तालुका नांदगाव जिल्हा नासिक यांनी पोलीस स्टेशन पाटोदा येथे फिर्याद दिली की, ” माझ्या कडे मेंढया राखण्यासाठी सालगडी म्हणुन दिपक केरा भिलाल हा होता. व आमचा नातेवाई शांतराम चंदु शिंदे यांचे कडे मेंढया राखण्यासाठी विलास एकनाथ मोरे हा सालगडी म्हणुन कामास होता. दिनांक 04/09/2025 रोजी आम्ही शिरुर तालुक्यातील दगडवाडी शिवारात सायंकाळी सर्व मेंढया जाळीमध्ये बंदीस्त करुन जेवण करुन झोपलो. माझा सालगडी व शांताराम शिंदे यांचा सालगडी विलास मोरे हे एकमेकाचे बाजुला काही अंतरावर झोपले होते. दिनांक 05/09/2025 रोजी पहाटे 03.30 वा सुमारास किंचाळण्याचा मोठा आवाज, दगड पडल्याचा आवाज आल्याने आम्ही आम्ही झोपेतुन जागे होवुन पाहिले असता दिपक भिलालाच्या डोकयातुन रक्त येत होते. व त्याचे बाजुला विलास मोरे उभा होता व तो काही तरी पुटपुटत रागाने बगत होता. त्यावेळी आम्ही विलास तु काय केलेस असे म्हणताच तो त्याठिकाणी त्याचे कडील मोबाईल, इतर साहित्य टाकुन पळुन गेला व विलास एकनाथ मोरे याने त्यास अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड टाकुन त्यास जिवे ठार मारले वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन पाटोदा गुरंन 277/2025 कलम 103 भा.न्या. सहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
त्यावरुन मा. पोलीस अधीक्षक सो, बीड, यांनी नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर व अमंलदार याचे पथक तयार करण्यात आले. नमुद पथकातील अधीकारी व अमंलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन आरोपीचा वेगवेगळया ठिकाणी शोध घेण्यात आला. आज दिनांक 08/09/2025 रोजी नमुद अरोपीचा शिरुर, चकलंबा, हद्वीमधील डोंगरमाळ रानामध्ये शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम आनंदगाव शिवारातील डोंगर परीसरामध्ये फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर व पथकामधील अमंलदार यांनी आनंदगाव शिवारातील डोगरमाळ परीसरात जावुन आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता तो मिळुन आला आहे. सदर आरोपी नामे विलास एकनाथ मोरे रा.निमगांव ता. वैजापुर जि. संभाजीनगर यास पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पाटोदा यांचे स्वाधीन केले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन पाटोदा येथील अधिकारी करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर,पोह/अशोक दुबाले,पोह/सोमनाथ गायकवाड,पोह/बाळु सानप,पोकॉ/अश्पाक सय्यद,पोकॉ/मनोज परजणे, पोकॉ/अर्जुन यादव, अश्विन सुरवसे, पोकॉ सुनील राठोड, पोकॉ/सिध्देश्वर मांजरे यांनी केली आहे.