चॉकलेट घशात अडकल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.
हसऱ्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू,पालकांनो नवजात बालकांकडे लक्ष द्या.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील काटवटवाडी येथील आरोही आनंद खोड या सात महिन्यांच्या मुलीचा चॉकलेट घशात अडकल्याने मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने खोड कुटुंब व आठवतवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
लहान मुलांना डोळ्यात तेल घालून जपावं लागतं, जरा नजर फिरली की काहीतरी कुरापती सुरू होतात. काहीवेळा त्यांच्या या उचापतींमुळे त्यांचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बीडमधून समोर आली. एका छोट्याशा चुकीमुळे ७ महिन्यांचं लेकरु आईपासून कायमचं दुरावलं सात महिन्यांच्या मुलीचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली.
काटवटवाडी गावातील खोड कुटुंब पुण्यात वास्तव्यात आहे. आजी आजोबा ने गावाकडे बोलवल्याने दोन दिवसापूर्वी खोड कुटुंबीय काटवटवाडी या आपल्या मूळ गावी आले होते, हसरं बाळ पाहून खोड कुटुंबीय व नातेवाईकाचा आनंद गगनात मावत नव्हता.खोड यांच्या मोठ्या भावाच्या मुलांनी खाण्यासाठी चॉकलेट आणले होते,ते आरोही जवळ बसून चॉकलेट खात होते त्यातच सात महिन्यांच्या चिमुकलीने तोंडांत चॉकलेट घातले. यामुळे चॉकलेट घशात अडकून मृत्यू झाला. आरोही आनंद खोड असं मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. आरोही घरात खेळत होती. खेळता-खेळता तिने खाली पडलेले चॉकलेट पाहिले आणि ते उचलून तोंडात टाकले.
लहान बाळाला गिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे झालेली नसते, चॉकलेट घशात अडकल्याने त्रास होऊ लागल्याने श्वासोश्वास बंद झाला ही बाब घरातील लोकांच्या लक्षात येतात तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. चॉकलेट घशात पूर्णपणे अडकल्यामुळे तिला श्वास घेणं कठीण झालं, ही गंभीर परिस्थिती पाहून कुटुंबीयांनी तात्काळ तिला जवळच्या डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारासाठी वेळ न मिळाल्याने तिची अवस्था अधिकच खालावली. शेवटी, तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नातेवाईक धावले. मृतदेहाला कुशीत घेऊनच रुग्णालयात घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. चिमुकलीच्या या दुर्दैवी अंताने कुटुंबाने हंबरडा फोडत आक्रोश केला. चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंब व नातेवाईकानी हळहळ व्यक्त केली.