अर्चना कुटे सीआयडीच्या ताब्यात !
गुन्हे दाखल असल्याने वीस महिन्यापासून अर्चना कुटे होत्या फरार.

बीड दि.१६ (प्रतिनिधी)बीड सह महाराष्ट्रात ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जवळपास 52 शाखा होत्या या शाखेतील ठेवीदाराची रक्कम वेळेवर न परत मिळाल्याने ठेवीदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट अध्यक्ष व संचालकावर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून अर्चना कुटे ह्या फरार होत्या.
अर्चना कुटेनी तिरूमला या नावाने अनेक ऑईल कंपन्या उघडण्यात आल्या होत्या. द कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे सुरेश कुटे सह संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, कुलकर्णी हे बीड जिल्हा कारागृहात असून अर्चना कुटे मात्र फरार होत्या.
दोन वर्षापासून अर्चना कुटे फरार असल्याने बीड पोलीस व सीआयडी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.परंतु आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कुटे ग्रुपच्या संचालक अर्चना कुटे यांना पुण्यातून सीआयडीच्या टीमने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. ज्ञानराधातील हजारो ठेविदारांची फसवून करत कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी अर्चना कुटेना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला होता. यामुळे अनेक ठेवीदारांनी आपले प्राण ही सोडले. सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.आत तरी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्ञानराधाच्या खातेदारांना पैसे परत मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.