बोंबला ! केंद्रप्रमुख(शिक्षकच)लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
एसीबीच्या धडक कारवायाने लाचखोरांचे धाबे दणाणले.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात दिवसेंनदिवस वाढ होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयामध्ये टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याचे चित्र सध्या शासकीय कार्यामध्ये पहावयास मिळत आहे.
काल दिनांक १९ सप्टेंबर रोजी केज तालुक्यात ग्रामसेवकाला घरकुलसंबंधी कागदपत्रासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (20 सप्टेंबर) बीड तालुक्यातील आणखी एक कारवाईत केंद्रप्रमुख गोविंद सुखदेव शेळके (वय 56, रा. धायगाव, ता. गेवराई) यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना जेरबंद करण्यात आले.
शेळके हे जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कोळगाव (ता. गेवराई) येथे व्यवसाय नोकर आहेत. तक्रारदाराकडून आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी मदत करण्याच्या बदल्यात त्यांनी 5,000 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवल्यानंतर सापळा रचून त्यांना पकडण्यात आले.
सलग दोन दिवसांत झालेल्या कारवायांमुळे लाचखोरांच्या तंबूत मोठी घबराट पसरली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राऊळकुमार भोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, शशिकांत शिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिह्नमपल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग कावगुंडे, अनिल शेळके, अमोल खरसाळे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आधान, सचिन काळे, अंबादास पुरी, गणेश मेत्रे सर्व ला.प्र.वि.बीड युनिट बांनी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ष्ट्रचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाब मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत कार्यालयाशी संपर्क साधावा.