माजलगावात ढगफुटी ! मंदिरे पाण्याखाली,अनेक गावाचा संपर्क तुटला.
सांडस चिंचोलीत प्रसूती झालेल्या महिलेला एन डी आर एफ च्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

माजलगाव दि.23 (तुकाराम येवले) गेल्या आठवड्यापासून धुवाधार पाऊस झाल्यामुळे माजलगाव तालुक्यात जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली आहे माजलगाव चे धरण भरल्यामुळे सिंदफना नदी पात्रात एक लाखापेक्षा जास्त क्युसेस पाणी सिंधफना नदी पात्रात सोडले आहे त्यामुळे सांडत चिंचोली गावाला पूर्ण पाण्याने वेढले असून या गावात एका महिलेची पहाटे डिलिव्हरी झाली होती सदर महिलेला सकाळी सहा वाजता एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे.
गेल्या दोन दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे माजलगाव धरण हे ऑगस्ट महिन्यातच भरले होते परंतु गेल्या दोन दिवसापासून पाऊस जास्त झाल्यामुळे माजलगावच्या धरणातून शेंदफना नदीपात्रामध्ये पहाटे चार वाजल्यापासून एक लाख पाच हजार सहाशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदी पात्रात झाला आहे त्यामुळे सिंदफणा नदी पात्राच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला होता परंतु सांडत चिंचोली या गावाला पाण्याने पूर्ण वेडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे या गावात एका महिलेची पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास डिलिव्हरी झाली होती सदर महिला व बाळ सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी सकाळी तिथे जाऊन महिलेला व बाळाला सुखरूप बाहेर काढले आहे या इंडिया आर एफ च्या जवानांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे माजलगावच्या जुन्या पुलावरून पाणी जात आहे तर तालुक्यातील गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे सावंगीच्या पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे माजलगाव आष्टी चा संपर्क तुटला आहे या दोन दिवस झालेल्या पावसामुळे माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीकाठच्या व गोदावरी काठचे अनेक गाव हे पाण्याखाली गेले आहेत मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मोरया शहराचे मंदिरही पाण्याखाली गेलेले आहे सध्या प्रशासनाच्या वतीने गोदावरी व सिंदफना नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.