
अभय जोशी अंबाजोगाई घाटनांदुर-श्रीगोंदा-दौंड प्रकल्पा सह बीड स्टेशन विस्तारा साठी डॉ. आदित्य पतकराव व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री व्ही. सोमन्ना यांची दिल्ली रेल भवनात महत्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली – ( विशेष वृत्त )
मध्य रेल्वेचे झोनल सदस्य अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉ. आदित्य पतकराव यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांची भेट घेऊन घाटनांदुर–श्रीगोंदा–दौंड रेल्वे लाईन प्रकल्पाचा पुनः सर्व्हे करून लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सी व्ही सोमन्ना यांच्या भेटीत डॉक्टर आदित्य पतकराव यांनी प्राधान्याने घाटनांदुर श्रीगोंदा दौंड रेल्वे लाईन सह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पा संदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी डॉ. आदित्य यांनी घाटनांदुर–श्रीगोंदा–दौंड रेल्वे लाईन मुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क वाढेल व औद्योगिक तसेच सामाजिक विकासाला चालना मिळेल असे मुद्देसूद पणे स्पस्ट करून या प्रकल्पाचा पुनः सर्व्हे करून लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली.
याशिवाय त्यांनी पुणे विभागातील बीड स्टेशनचा विस्तार या विषयावर भर दिला. बीड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आधुनिक प्रवासी सुविधा, अतिरिक्त ट्रॅक आणि पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत डॉ. आदित्य यांनी वंदे भारत ट्रेन व फास्ट लाईन सेवा या भागातून सुरू करण्याचीही सूचना केली, ज्यामुळे प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवास करता येईल.
त्यांनी रेल मंत्रालयास आपल्या सर्व निरीक्षण दौर्यांचा अहवाल सादर करत तातडीने अंदाजपत्रक मंजुरी देण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांनी या सर्व विषयावर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले व डॉ. आदित्य पतकराव यांच्या कार्याचे कौतुक केले.
बैठकीच्या शेवटी डॉ. आदित्य पतकराव यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सी व्ही सोमन्ना यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.
घाटनांदुर श्रीगोंदा दौंड रेल्वे रेल्वे मार्गासाठीच्या डॉ पतकराव यांच्या पाठपुराव्या मुळे नागरिकांच्या अशा पल्लवीत
डॉ पतकराव यांच्या घाटनांदुर श्रीगोंदा दौंड या रेल्वे मार्गाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील अंबाजोगाई- केज- नेकनूर- मांजर सुंबा – पाटोदा – जामखेड सर्वच गावातील नागरिकांच्या अशा पल्लवीत झाल्या आसुन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्यासह या मार्गाशी निगडित सर्वच लोकप्रतिनिधीने ही आता आपले वजन दिल्ली दरबारी वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.