
अंबाजोगाई- प्रतिनिधी :–आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन उत्साहात व आनंदी वातावरणात लक्ष्मीनारायण कुबेरेश्वर गणेश मंदिर छत्रपती नगर अंबाजोगाई येथे पार पडले.
भारतीय संस्कृतीची उच्च मुल्ये सर्वसाधारण नागरिकांना श्रेष्ठत्व प्राप्त करून उत्तम नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. तथापि पाश्चिमात्य व भौतिक सुविधांच्या आहारी जाताना आजचा युवक नीतिमूल्याशिवाय वावरताना अनेक संकटांना सामोरे जातो. अशा संकट काळात टिकून राहणे व यशस्वीते कडे वाटचाल करणे यासाठी संस्कार मूल्य जपणे अत्यंत गरजेचे असते. हा पाश्चात्य संस्कृतीकडे असणारा मुलांचा ओढा थांबवून त्यांना भारतीय संस्कृतीमधील योग प्राणायाम कला, क्रीडा, चित्रकला, मंत्र स्तोत्र पठण, सणवार, भारतीय संस्कृतीमधील चालीरीती, व त्यामधील विज्ञान आणि समाजभान, नातेसंबंध कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, याविषयी जागरूकता निर्माण करणे सद्यपरिस्थितीत आवश्यक आहे.हाच उद्देश समोर ठेवून अखिल भारतीय पेशवा संघटना बीड जिल्हा शाखा अंबाजोगाई यांच्या वतीने बाल संस्कार केंद्राचे रीतसर उद्घाटन ह भ प श्रीमान पांडुरंग पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री संजय देशपांडे हे होते. केंद्रात दर रविवारी बालकांना संस्कार वर्गाच्या माध्यमातून विविध मूल्यांचा व संस्कारांचा हसत खेळत पाठ घेण्यात येणार आहे.या केंद्रात उज्वला कुलकर्णी, अंजली देशपांडे, सौ रजनी देशपांडे,श्रीमती अंजली चौधरी, आणि सौ यमुना पाखरे यांचे विविध विषयावर संस्कारात्मक पाठ घेण्यात येणार आहेत. या केंद्राचा केंद्राचा छत्रपती नगर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून श्रीमान गणपती स्वामी, श्री सुरेश खंदारे, श्रीमान राम बडगीरे, सौ यमुनाताई पाखरे, श्री आर पी गिरी आदींची उपस्थिती होती.
संघटनेचे उपाध्यक्ष श्री महेश राव वाडकर कोषाध्यक्ष भास्कर देशपांडे सचिव डॉक्टर दिलीप कुलकर्णी सहसचिव श्री विवेक वालेकर आणि सदस्य श्री अभय जोशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले तर आभार श्री भास्कर देशपांडे यांनी मानले. यावेळी संस्कार वर्गासाठी वीस पालकांनी आपल्या पाल्यांचे नाव संस्कार केंद्रात नमूद केले. परिसरातील पालक व लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या पालकांनी हे स्तुत्य उपक्रम असून अशा केंद्राची नितांत गरज होती अशा भावना बोलून दाखवल्या बोलून दाखवल्या आणि या केंद्राच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन छत्रपती नगरीत नगर येथील नागरिकांनी देताना संघटनेबद्दल मनस्वी आभार व्यक्त केला. गणेश मंदिरात सुरू झालेला हा बाल संस्कार वर्गाचा श्री गणेशा निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना उपस्थितानी बोलून दाखवल्या. घ्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भास्कर देशपांडे की संजय देशपांडे डॉक्टर दिलीप कुलकर्णी सौ रजनी देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.