
अभय जोशी-अंबाजोगाई सरस्वती गणेश मंडळ अंबाजोगाई यांच्या कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. नुकतेच बीड जिल्हा राज्य शासनाच्या गणेशोत्सव स्पर्ध्येत सरस्वती गणेश मं. यांना दुसरा क्रमांक पटकवला आहे.त्या मधून मिळालेला बक्षीस निधी पुढिल वर्षासाठी राखून न ठेवता पूरग्रस्तांना मदत म्हणून या वर्षी राक्षसवाडी यांना देण्याचा निर्णय घेऊन दि ३ ऑक्टोबर रोजी गावात जाऊन वाटप केले. पुरामुळे शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यासाठी गहू,पीठ,साखर, तेल,तुरडाळ, मीठ तर छोट्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट करण्यात आले.भक्ती पथावर माणुसकीचे एक पाउल या गणेश मंडळाकडून टाकण्यात आले. फुल ना फुलांची पाकळी प्रमाणे हि मदत करून त्यानी धान्य, शालेय किट वाटप केले. त्यासाठी सरस्वती गणेश मंडळ यांचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.