
अभय जोशी:- अंबाजोगाई छत्रपती कॉलनी येथे बालसंस्कार केंद्राचा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण झाला. या वेळी ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती होती .भारतीय संस्कृतीचे मूल्ये जतन करून उत्तम नागरिक बनविण्यासाठी या वर्गाची सुरुवात झाली. यावेळी विध्यार्थ्यांना खूपच सुंदर मार्गदर्शन करून हि काळाची गरज असल्याचे सांगून त्यांना संस्कृतीचे देण्यात आले.यामध्ये सौ उजवला कुलकर्णी, रजनी देशपांडे, यमुना पाखरे यांचा सहभाग होता. अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या माध्यमातून संजय देशपांडे, सुधीर धर्माधिकारी,भास्कर देशपांडे, ह भ प पांडुरंग पाखरे,श्री कुलकर्णी या सर्वांच्या उपस्थितीत हा वर्ग चालू झाला. शेवटी मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले.