राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत बैठकीस उपस्थित राहावे -अमर नाईकवाडे.
नगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवार संवाद तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे.

बीड दि. १८ (प्रतिनिधी):- २०२५ मध्ये होणाऱ्या बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर आबा चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी, रविवारच्या दिवशी सकाळी ११ वाजता छत्रपती कॅपीटल, मित्रनगर चौक, बीड येथील पक्षाच्या अधिकृत जिल्हा कार्यालयात पार पडणार आहे.
या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांशी प्राथमिक संवाद साधणे, निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवणे आणि संघटनात्मक बळकटीसाठी पुढील दिशा ठरवणे असे आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पक्षाची निवडणूकपूर्व तयारी अधिक सुसूत्र करण्यासाठी ही बैठक अत्यंत गरजेची आहे. इच्छुक उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस वेळेत उपस्थित राहून निवडणुकी संदर्भातील सूचना व अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले.
बूथ स्तरावर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी – निवडणुकी संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी पत्रकार द्वारे केले आहे.