ब्रेकिंग न्यूज

हत्या की आत्महत्या? 

छातीत गोळी लागलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह.

बीड( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, मुलांचे नक्षत कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे शर्तीचे प्रयत्न करत आहेत.तरी देखील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे खुनाचे सत्र काही कमी होताना दिसत नसल्या चित्र सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

अंभोरा-हिवरा रस्त्यावर खळबळजनक घटना; मृतदेहाजवळ दुचाकी व पिस्टल सापडल्याने खळबळ उडाली.

आष्टी तालुक्यातील अंभोरा-हिवरा रस्त्यावर एका तरुणाचा छातीत गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक १८ ऑक्टोबर शनिवारी रोजी उघडकीस आली.या घटनेचे बीड जिल्हा पुन्हा हादरला.

काही नागरिकांना रस्त्याच्या बाजूला मृतदेह दिसल्याने तत्काळ आष्टी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याने पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.

मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण (वय ३५, रा. वाघळुज, ता. आष्टी) अशी ओळख झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, तसेच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, आदिनाथ भडके, हवालदार बाबासाहेब गर्जे आणि अमलदार शिवदास केदार, अमोल ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ दुचाकी आणि विनापरवाना पिस्टल आढळून आले आहे. मृताच्या छातीत गोळी झाडल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने ही हत्या की आत्महत्या?याबाबत चे गूढ कायम आहे.पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button