बीडचा पाणी प्रश्न पेटला,नगरपालिकेच्या दारात शिवसेना आक्रमक.
शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक.

बीड शहराला पाणी पुरवण्यास बीड नगरपालिका प्रशासन सपशेल फेल झाले असून ऐन उन्हाळ्यात बीड शहरातील काही भागात तर महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासन बीड शहरवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे देखील दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न बीड शहरात भेडसावत असून यावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या नसल्यानेच ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी वर नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
आज शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेवर धडक मोर्चा काढत नगरपालिकेच्या दारातच मडके फोडून आंदोलन करण्यात आले.यावेळी बीडपालिके विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. तर नगरपालिकेच्या दाराला मडक्याचे तोरण बांधण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम सह पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.