
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथे सायंकाळी मोटार सायकलस्वार आणि कंटेनरचा अपघात ; जखमीला जिल्हा रुग्णालयात हलवले.
लिंबागणेश:- ( दि.१०) आज दि.१० शनिवार रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता मुळुकवाडी येथील महादेव आजिनाथ ढास वय ४० वर्षे हे मोटार सायकल ( वाहन क्रमांक एम.एच.२३ ए.एल.७२३०) वरून लिंबागणेशकडे जात असताना मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वरील लिंबागणेश परीसरातील हाँटेल राजयोग समोर सकाळपासून रोडच्या साइडला फेल झाल्याने पंख्यावर उभे असणारे कंटेनर (वाहन क्रमांक एन.एल.०१ एक जी ५५९० ) यांना समोरून वाहन आल्याने नियंत्रण सुटल्याने कंटेनर वर आदळली.यामध्ये महादेव ढास गंभीर जखमी झाले असुन त्यांना तातडीने खाजगी वाहनाने बीडला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित अपघाताची कल्पना नेकनुर पोलिस स्टेशनचे व लिंबागणेश पोलिस चौकीचे कर्मचारी यांना देण्यात आली आहे.