बीड गोळीबार प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर.
ॲड.अविनाश गंडले यांचा प्रभावी व अभ्यासपूर्ण युक्तिवादाने मकोका मधून देखील सुटका.

बीड (प्रतिनिधी) : बीड शहरातील बार्शी नाका,प्रकाश आंबेडकर नगर मध्ये दिनांक 13/12/2024 रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अभिषेक विश्वास डोंगरे यांच्या घरी जावून गोळीबार केल्या प्रकरणी अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर, आशिष आठवले, प्रसाद धिवार विरोधात गन्हा दाखल झाला होता.वरील आरोपीच्या हातात पिस्टल होते व प्रसाद धिवार हा घर दाखवत होता, अशा प्रकारची फिर्याद फिर्यादीने पेठ बीड पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यामध्ये दिनांक 19/06/2024 रोजी प्रसाद धिवार सोबत झालेल्या भांडणाचे कारण काढुन दिनांक 13/12/2024 रोजी घरावर गोळीबार केला अशा प्रकारची फिर्याद दिली होती. सदरील आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता. यामधील आरोपी प्रसाद धिवार यांचा मोक्का कमी करण्यात आला.
आरोपी प्रसाद धिवार याचेवर कलम 109, 191 (2), 191 (3), 190, 61 (2), 115 (2), 352, 351 (2), 333 बी.एन.एस. नुसार व कलम 3, 25, 27 शस्त्र अधिनियम कायद्या अंतर्गत तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी तर्फे प्रसिध्द विधिज्ञ ॲड. अविनाश पं. गंडले यांच्या मार्फत जामीन दाखल करण्यात आला होता. आरोपीचे वतीने ॲड. अविनाश पं. गंडले यांनी केलेला प्रभावी व अभ्यासपुर्ण युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. 1 ले जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड यांनी जामीन मंजुर केला. सदरील प्रकरणाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. आरोपी तर्फे ॲड. अविनाश पं. गंडले यांनी काम पाहिले, त्यांना याकामी ॲड. इम्रान ए. पटेल, ॲड. सुरक्षा जावळे, ॲड. बप्पा माने, ॲड. के.डी. मस्के, ॲड. राजेश बी. शिंदे, ॲड. एस.जे. गिरी, ॲड. शुभम सरवदे, यांनी सहकार्य केले.