अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक,चालक पोलिसांच्या ताब्यात.
सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड जिल्ह्यामध्ये वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असताना देखील काही वाळू माफिया अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी मध्ये वाळू भरलेला ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता आज दिनांक २२ मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ट्रॅक अडवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आल्याने ट्रॅक पुढील कारवाईसाठी ट्रक सह चालक ताब्यात घेतला. विकास नवनाथ पवार, वय 28 वर्ष रा. विमानगाव ता.आष्टी असे चालकाचे नाव असून तो विनापरवाना वाळू वाहतूक करत असल्याचे त्याने कबूल केले.वाळू व वाहनाची किंमत असा सहा लक्ष तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध रित्या विना परवाना वाळूची वाहतूक केल्याने, त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन आष्टी गुरन 234/2025 कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही करावी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रॉपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली PSI/ श्रीराम खटावकर, पो.हे./ अशोक दुबाले, पो. ह.सोमनाथ गायकवाड,NPC/ बाळू सानप,पो.ह.अर्जुन यादव यांनी ही कारवाई केली.