
बीड तालुक्यातील महाजन वाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी गार्डन केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकृत माहिती लवकरच हाती येईल.
बीड जिल्ह्यातील पवनचक्की खंडणी प्रकरणाची बीड जिल्हासह महाराष्ट्रात चर्चा झाली होती.
बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या महाजनवाडी येथील असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर दिनांक २२ मे रोजी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला त्यावेळी सिक्युरिटी गार्ड असलेल्या व्यक्तीने प्रत्युत्तर म्हणून त्या लोकांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्याबाबत अधिकृत दुजोरा मात्र अद्याप मिळू शकलेला नाही.
जिल्ह्यातील पवन चक्की प्रकल्पामध्ये लाखो रुपयांचे साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर बीड पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळून पवनचक्कीतील साहित्य चोरांकडून जप्त केले होते. याच पार्श्वभूमीवर पवनचक्की प्रकल्पाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
महाजनवाडी येथील पवनचक्की प्रकल्प, घटनास्थळी नेकनूर पोलीस आणि बीड पोलीस दखल झाले असून सविस्तर वृत्त काही वेळात देण्यात येईल.