ब्रेकिंग न्यूज

माझा वाढदिवस “बॅनरमुक्त” करा…अनिलदादा जगताप

गरजवंतांना मदतीचा हात हीच माझ्यासाठी खरी शुभेच्छा-अनिलदादा

बीड(प्रतिनिधी)- शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांचा वाढदिवस येत्या बुधवार, ४ जून रोजी असून प्रत्येक वर्षी हा दिवस जिल्हाभरातील शिवसैनिकांसाठी एक उत्सव असतो. निष्ठावंत शिवसैनिकांकडून अनिलदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, शहरभर बॅनर्स लावले जातात आणि हा दिवस जल्लोषात साजरा होतो. मात्र यंदा अनिलदादांनी आपल्या शिवसैनिकांना एक भावनिक आणि विचारप्रवृत्त करणारे आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून शिवसैनिकांना सांगितलं आहे की, “माझा वाढदिवस बॅनरमुक्त करा. हे बॅनर लावण्यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात जातो. त्याऐवजी हा पैसा गरजूंवर खर्च करा.”तसेच सामाजिक उपक्रम राबवून वृक्षारोपण करावे अनिलदादांचे हे आवाहन केवळ एक विनंती नसून समाजासाठी आपली जबाबदारी ओळखणाऱ्या नेत्याचे भावनिक मनोगत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशा वेळी रस्त्यांवर भरपावसात भाजी विकणारे, कामावर जाताना मजूर, यांच्यासाठी रेनकोट किंवा छत्र्यांचे वाटप हा एक छोटा प्रयत्न असला, तरी त्यांना दिलासा देणारा हात ठरेल. माझा खरा वाढदिवस तेव्हाच साजरा होईल, जेव्हा गरिबांच्या चेहऱ्यावर तुमच्या मदतीमुळे हास्य उमटेल,” असं सांगत अनिलदादांनी शिवसैनिकांना एक नवा विचार देत वाढदिवस गरजावंतांना मदतीचा हात द्या असे आवाहन केले आहे.

*चौकट-*

 *सामाजिक उपक्रमांनी होणार अभिष्टचिंतन!*

अनिलदादांच्या प्रेरणादायी आवाहनाला प्रतिसाद देत, जिल्हाभरातील शिवसैनिक अनिलदादांच्या वाढदिवसावर होणाऱ्या विविध खर्चातून सामाजिक उपक्रम राबवणार आहेत. अनेक ठिकाणी रेनकोट वाटप, अन्नदान, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर तसेच विविध समजपयोगी उपक्रमांचे आयोजन शिवसैनिक करणार आहेत. 

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button