कत्तलसाठी जाणाऱ्या सतरा गाई पोलिसांच्या ताब्यात
एस.पी.पथक व पेठ बीड पोलिसांची कारवाई.

बीड जिल्ह्यामध्ये बकरीईदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावराची कत्तल केली जाणार असल्याची माहिती पोलिस स्टेशन पेठ बीड यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून मोहम्मदिया कॉलनी जवळ प्लॉट मध्ये दोरीने बाधून ठेवलेले १७ गोवंश मिळून आले. त्या ठिकाणी छापा टाकून सर्व गोवंश ताब्यात घेतले.या प्रकरणी आरोपी गणी बबलू कुरेशी कुरेशी मोहल्ला व इतर दोन अनोळखी घटना ठिकाणावरून पळून गेले. एकूण 17 गोवंश किंमत 250000/- दोन लाख पन्नास हजार रुपये चे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी मीना साहेब यांचे मार्गदर्शनखाली पोलिस स्टेशन पेठ बीड पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज, Api प्रीतमकुमार पुजारी ,PSI राजू गुळभिले,HC/नितीश माने, चालक इम्रान सय्यद यांनी केली.