ब्रेकिंग न्यूज

वाल्मीक कराडला”जेल की बेल”७ जुलैला फैसला.

वाल्मीक कराड हाच हत्ये मागील मुख्य सूत्रधार..उज्वल निकम

 

मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बीड जिल्हा कारागृहात असून यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने या हत्तीच्या आरोपातून दोष मुक्त करावे असा अर्ज बीड मकोका न्यायालयात केला.यावर आज बीड न्यायालयात सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी उपस्थित राहून युक्तिवाद केला.

वाल्मीक कराड या हत्येत वाल्मीक कराड याला या हत्येतून व मकोकातुन दोष मुक्त करावे अशी मागणी वाल्मीक कराडच्या वकिलाने न्यायालयात केली असता सरकारी वकील उज्वल निकम यांनी वाल्मीक कराड हाच देशमुख हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचा पुरावे न्यायालयात सादर करून दोषमुक्ती अर्जास विरोध केला. न्यायालयाने दोन्हीही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत ७ जुलै रोजी सुनावणी दरम्यान निकाल देणार असल्याचे सांगितले.

देशमुख हत्येची पुढील सुनावणी ही ७ जुलै रोजी होणार असून वाल्मीक कराड ला “जेल की बेल”फैसला होणार आहे. या सुनावणीकडे बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button