प्रा.विजय पवारवर विद्यार्थिनी छळ प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल.
छळ व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत वाढ.

बीड येथील उमाकिरण संकुल येथील कोचिंग क्लासेस मधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गेल्या एक वर्षापासून लैंगिक छळ केल्याने प्रा. विजय पवार व प्रशांत खाटोकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत असून आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने इतरही काही मुलीवर लैंगिक छळ झाल्याचा संशय व्यक्त केल्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बीड पोलिस अधीक्षक यांना पालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले होते.दरम्यान एका पालकाने लैंगिक छळाची तक्रार दिल्यानंतर आता शिवाजी नगर पोलिसांत आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.यामुळे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पालकाच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.
बीड पोलीस अधिक्षकांनी शाळेतील व कोचिंग क्लासेस मधील पालकांना विश्वासात घेत पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. पोलीस अधिक्षकांच्या आवाहनानंतर आता पालक पुढे येऊन तक्रारी दाखल करु लागल्याचं दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील क्लासमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगक छळ प्रकरणात दोन्ही आरोपीचे पोलिसांनी लॅपटॉप, सीसीटीव्ही आणि मोबाईल जप्त करुन फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठणवण्यात आले आहेत.या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचे जबाब सुद्धा पोलिसांनी नोंदवले आहेत.
एसआयटी चौकशी
बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले.
अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने प्रा.विजय प्रवर व प्रशांत खाटोच्या अटचणीत वाढ झाली आहे.