दारूची चोरटी वाहतूक करणारे वाहन जप्त.
पाच लाखाचा मुद्देमाल जप्त,बीड वाहतूक शाखेची कारवाई.

दिनांक 09/07/2025 रोजी रात्री नऊ वाजता वाहतुक शाखेचे स.पो.नि. सानप साहेब, पोह / 1664 आघाव ने.प्रो.स्टे. शिवाजीनगर असे खाजगी वाहणाने पोलीस स्टेशन हद्दीत सोबत पेट्रोलींग करीत असताना नगर नाका येथे आलो असता आम्हास आमचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, नगर नाक्याकडुन नाटयागृहाकडे एका पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट गाडीमध्ये विनापरवाना अवैधरित्या विदेशी दारुची चोरटी वाहतुक करुन घेवुन जात आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन आम्ही कॅनॉल रोडवर परिवार मंगल केंद्राचे समोर पंचनाम्यातील नमुद पंचाना नमुद ठीकाणी बोलावुन त्यांना बातमीचा आशय सांगुण छापा मारते वेळी पंच म्हणुन हजर राहणे बाबत कळवलेवरुन पंच तात्काळ हजर आले. पंचाना पंच म्हणुन हजर रहाणेबाबत कळविले असता त्यांनी पंच म्हणुन हजर राहणेस सहमती दर्शवली. पंचनाम्यातील नमुद दोन पंचासह कैनाल रोडवरील परीवार मंगल केंद्रासमोर रोडवर थांबलो, तेव्हा 21.30 वा. दरम्यान एक मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडी आमच्याकडे येताना दिसली. सदरची गाडी आम्ही पंचासमक्ष थांबवून गाडी चालकास त्यांचे नाव व पत्ता विचारणा केली असता त्यानी त्याचे नाव अशोक पिराजी जाधव वय 38 वर्षे, रा. लोणी घाट ता.जि.बीड असे सांगितले. तेव्हा त्याचे गाडीची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये खालील प्रमाणे प्रो. गुन्हयाचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
1) 4080/- :- एम्पेरीयल ब्लु व्हीस्की कंपनीच्या काचेच्या 180 ml च्या 24 सिलबंद बाटल्या प्रति बॉटल विक्री किंमत 170/- रु प्रमाणे एकुण 4080/-
2) 4400/-:- रॉयल स्टैंग व्हीस्की कंपनीच्या काचेच्या 180 ml च्या 22 सिलबंद बाटल्या प्रति बॉटल विक्री किंमत 200/- रु प्रमाणे एकुण 4400/-
3) 1760/-:- ग्रॅण्ड मास्टर ऑरेंज वोडका कंपनीच्या काचेच्या 180 ml च्या 08 सिलबंद बाटल्या प्रति बॉटल विक्री किंमत 220/- रु प्रमाणे एकुण 1760/-
3)5,00,000/-:- एक पांढऱ्या रंगाची मारुत सुझुकी स्वीफ्ट गाडी जीचा पासिंग क्र. एम एच 16 बी. वाय. 2011 दारु वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेला जुना वा.किं.अ. नमुद मिळुन आलेल्या मालाचा वाहतुकीचा परवाना असले बाबत आरोपीला विचारले असता आरोपीने त्याचेकडे परवाना नसल्याचे सांगितले. अ.क्र. 1 ते 3 मधुन प्रत्येकी एक एक सिलबंद बाटली घेवुन त्यावर पोह/1664 आघाव यांचे व पंचाच्या चिठ्याचे लेबन लावुन त्यावर ऑफीस लाखेची सिल मोहर करुन सि.ए. सॅम्पलकामी ताब्यात घेतले व बाकी माल पंचा समक्ष पोह/1664 आघाव यांनी जागीच जप्त केला.
एकुण 5,10,240/-रुपयांचा माल
इसम नामे अशोक पिराजी जाधव वय 38 वर्षे, रा. लोणी घाट ता. जि. बीड याने विनापरवाना बेकायदेशीर रित्या दारु वाहतुकीचा कसलाही वैध परवाना नसतांना कॅनॉल रोडवरुन नाटयगृह चौकाकडे त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारुत सुझुकी स्वीफ्ट गाडी जीचा पासिंग क्र.एम एच 16 बी. वाय. 2011 मध्ये वरील वर्णनाचा व किमतीची विदेशी दारुची चोरटी वाहतुक करुन घेवुन जात असतांना 21.30 वा. मिळुन आले म्हणुन माझी आरोपी नामे अशोक पिराजी जाधव वय 38 वर्षे, रा. लोणी घाट ता.जि.बीड याचे विरुद्ध कलम 65 (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.