देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार !
देशमुख हत्येतील मकोका न्यायालयाचे निरीक्षण.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती.ही हत्या खंडणीतून झाल्याचे स्पष्ट झाले असून देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घुण करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली होती,यातील आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते.
देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सह इतर आरोपी कारागृहात असून वाल्मीक कराडचे न्यायालयात अर्ज केला का मला या हत्येतून दोषमुक्त करण्यात यावे.परंतु दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.यामुळे वाल्मीक कराडला हा धक्का मानला जात आहे.
देशमुख हत्येतील मकोका न्यायालयाचे निरीक्षण:
१. वाल्मीक कराड हाच संघटीत टोळीचा म्होरक्या आहे. तोच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे.
२. दोन कोटींच्या खंडणीसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या.
३. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांचा अडसर झाला म्हणून वाल्मीक कराड आणि साथीदारांनी कट रचून, अपहरण करून संतोष देशमुख यांचा खून केला.
४. अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे याचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब व डिजिटल इव्हिडन्स फॉरेन्सिक या सबळ पुराव्यांवरून वाल्मीक कराडच या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे
५. वाल्मीक कराडवर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या १० वर्षात गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.
६. कराडच्या निर्दोष मुक्तीची व्याप्ती मर्यादित आहे. खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणे आहेत म्हणून आम्ही त्याची दोषमुक्तीची याचिका फेटाळतो.
एखादी हत्या करताना त्या व्यक्तीला हालहाल करून मारणे, परिसरात आपली दहशत वाढावी म्हणून मारतानाचे फोटो व चित्रीकरण व्हायरल करणे, हत्या केलेल्या व्यक्तीची बोटे, मांसाचा तुकडा आपल्या टेबलवर पुरावा म्हणून पाहायला वाल्मीक कराडला आवडायचे. न्यायालयाने वाल्याला भरचौकात फाशी देऊन एका राक्षसाचा अंत कसा होतो याचा पुरावा जनतेला दाखवावा अशी मागणी ज्यातून होत आहे.तरच गुंडगिरी,भाईगिरी करणाऱ्यावर जरब बसेल.